तळोधी बा येथील भारतीय स्टेट बँक ठरतेय ग्राहकांसाठी डोकेदुखी
तळोधी बा.----- अप्पर तहसील कार्यालय तळोधी बा. अंतर्गत भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही बँक ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसापासून बँकेत ग्राहक केवायसी करण्यासाठी येत आहेत परंतू ग्राहकांकडून फार्म स्विकारला जातो मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आज या उद्या या अशा बतावण्या कर्मचाऱ्यांकडुन केल्या जातात त्यामुळे बाहेर गावून येणाऱ्या ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागते. व के वाय सी करणे हे आवश्यक असल्यामुळे त्यांना बाकीचे व्यवहार करायला जमत नाही. त्याचप्रमाणे निराधार महिला पुरुष यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते. तुम्ही इथून पैसे काढू नका सी एस पी सेन्टरवरून पैसे काढा असे सांगितल्या जाते त्यामुळे त्या वयोवृद्ध महिला किंवा पुरुषांना मानसिक त्रास सहन करून आल्या पावली परत जावे लागते. ग्राहकांना तीस हजाराच्या वर विडाल दिला जात नाही. कुठलाही नियम नसतांना फक्त तीस हजाराचा विद्राल दिला जातो. त्यामुळे जास्त पैशाची गरज असणाऱ्या ग्राहकांना त्रास होतो. तळोधी शाखेत कर्मचाऱ्यांचा सुध्दा तुटवडा आहे, कमी कर्मचारी असल्यामुळे ग्राहकांची कामे वेळेवर होत नाही.
या सर्व प्रकाराला बँकेचे व्यवस्थापक दोषी आहेत. या व्यवस्थापका विरोधात या अनेकदा ग्राहकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु अजूनपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली नाही. या अधिकाऱ्याला वरिष्ठांकडुन पाठबळ मिळत असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे. या अधिकाऱ्यांची बदली लवकरात लवकर करावी व बँकेत जास्त कर्मचारी पाठवावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!