उमा नदी पात्रात अवैध रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर तहसीलदार मॅडमची धडक कारवाई
कारवाई दरम्यान चारही ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर च्या चाव्या घेऊन पसार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील पिपरडा येथील उमा नदी घाटावर अवैध रेती तस्करांचा हैदोस सुरू असल्याची गोपनीय माहिती चिमूर तालुक्याची तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम यांना मिळताच दि. 16 एप्रिलला सकाळी सहा वाजता तहसीलदार मॅडम नी रेतिघाट गाठीत धडक दिली असता चार ट्रॅक्टर चालक वाहन जागेवर ठेवून चाब्या घेऊन पसार झाले सदर ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली परंतु चाव्या नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करता आले नाही.
सदर कारवाईत तहसीलदार मॅडम यांनी चारही ट्रॅक्टर वर कारवाई केली पंचनामा करून सदर वाहन जमा करन्याचे आदेश दिले. परंतु वाहन चालक हे वाहनाच्या चाव्या सहित पसार झाल्याने वाहन तहसील कार्यालयात जमा कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा तहसीलदार मॅडमनी पिपरडा येथील पोलिस पाटील व महसूल मंडळ अधिकारी तिडके यांना वाहनावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले.परंतु आदेशानंतर देखरेख करीत असताना वाहनचालकांनी मनमानी करीत रेती सहित वाहने पळवून नेली त्यामुळे रेती तस्करच्या मनमानी व उर्मट वागणुकीचा प्रत्यय समोर आला आहे. या येवढया मोठया करवाई नंतरही रेती तस्करी करणाऱ्या तस्करांनी कायदा बाजूला सारून रेतीचा कायदा हातात घेतल्याने तालुक्यात रेती तस्करांच्या मनमानी कारभाराला रोखणार तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तेव्हा सदर प्रकरणी चारही वाहनांचा तपास करून वाहने जप्त करून त्याच्यावर म्हसुलविभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
---------------------------------------------------------
सदर चारही वाहनावर पिपरडा येथील उमा नदीचे घटनास्थळ गाठून कारवाई केली असता पसार झालेल्या चारही ट्रकटर वर कारवाई सुरू असून लवकरच तहसील कार्यालयात जमा करून कारवाई करण्यात येईल.
तहसीलदार प्राजक्ता बुरांडे मॅडम चिमूर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!