चिमुर तालुक्यातील महसुल विभाग रेती तस्करावर मेहरबान असल्यामुळे गोरवट वासियांनी रेती तस्करावर लावली लगाम
तस्करांमध्ये भितीचे वातावरण
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यातील महसुल विभाग रेती तस्करावर मेहरबान असल्यामुळे गोरवट वासियांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्याची घटना घडली असून तब्बल २ तास गावकरी व रेती तस्करांत बाचाबाची झाली.तात्काळ सुचना देऊनही चिमुर तालुक्यातील महसूल विभाग घटना स्थळी दाखल होण्यास १ तास उशीर लागला असून उशीर का लागला असावा यांची काही साठगाठ तर नसावी असा संशय व्यक्त केला जात आहे.पोकलँड मशीन वर जप्तीची कारवाई नदीपात्रात मोजमाप करून आजपर्यंत जी रेती वाहतूक करण्यात आली त्याचा संपूर्ण महसूल हा मशीन मालका कडून वसूल करण्याची नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.मोजमाप करून सुद्धा कारवाई न केल्यास नदीतच आंदोलन करु अशाही घोषणा स्थानिक गोरवट वासीय महीला व पुरुषांनी दिल्या. हा प्रकार फक्त गोरवट पर्यंत मर्यादित नसून चिमूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रेती तस्करांनी हैदोस घातलेला असून नुकताच पिपर्डा व शिरपूर घाटावर रेती तस्करीच्या घटना ज्वलंत असतानाच दिनांक.१९ एप्रिल २०२३ च्या रात्री गोरवट गावाजवळील गोदनी नदी घाटावर होत असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्याकरिता गावकरी वर्गाने कंबर कसून घाटावर पोहचताच गावकरी व रेती तस्कारांत हमरी - तुमरी झाली. यानंतर रेती तस्करांनी गावकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी माघार न घेता नदी पत्रात असलेल्या पोकलँड मशीन ला घेराव घालून मशीनला नदिबाहेर घेऊन जाऊ दिले नाही. यासाठी गावकऱ्यांनी रेती तस्करांशी तब्बल २ तास लढा दिला. महसूल विभागाला याबाबत ची माहिती देऊनही तब्बल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचण्यास १ तास उशीर केला. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर सुधा शंका उपस्थित केली आहे. सदर मशीनचा पंचनामा करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. गोरवट येथील गोदनी नदी घाटावर मागील ३ दिवसांपासून रेती तस्करांनी जोमात रेती तस्करी सुरू केली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती तस्कर हे १ पोकलँड मशीन व अंदाजे ४० ते ५० हायवा व १० चाकी ट्रक च्या साहाय्याने रेती तस्करी जोमात करीत होते. यामध्ये काही ट्रॅक्टर चाही समावेश होता. गावकऱ्यांना याबाबत कल्पना आलेली होती मात्र सदर घाट लिलाव झाला असल्याचा खोटा बनाव करून रेती तस्करांनी गावकऱ्यांची फसवणूक केली. याची खरी माहिती गावकऱ्यांना माहिती होताच महसूल अधिकऱ्यांना माहिती देऊनही त्यांचेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी स्वतः कंबर कसून संपूर्ण गावातील जनतेनी एक मत करून आया बाया सहित पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या रक्षणासाठी हातात काठी घेऊन नदी पात्र गाठले. सरळ गावकरी नदीपात्रात जाताच रेती वाहतूक करणारे वाहन नदी पात्रातून पसार झाले. मात्र गावकऱ्यांनी रेती उपसा करणाऱ्या पोकलँड मशीनला घेराव घातला. यावेळी रेती तस्कर व गावकऱ्यांमध्ये हमरी - तुमरी झाली. परंतु पोकलँड चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने अनेकदा मशीन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी पोकलँड चालकाला चांगला दम देताच त्यानेही तिथून पळ काढला. सदर प्रकरणात रेती तस्कर ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्या तस्करांपैकी ३ ते ४ रेती तस्कर गावकऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु गावकऱ्यांनी पैशाला महत्व न देता मशीन ला बाहेर येऊ दिले नाही. अशी माहिती गावकऱ्यांकडून मिळाली असून १ तास अशिरा का होईना मात्र महसूल प्रशासन जागे झाले.आणि घटनास्थळी पोलिस प्रशासना सहित दाखल झालेत. पोलिस व महसूल प्रशासन येताच रेती तस्करांनी धूम ठोकली. परंतु पोकलँड मशीन गावकऱ्यांच्या मदतीने जप्त करण्यास महसूल प्रशासनाला यश आले. सदर कारवाई रात्रौ ११ वाजता करण्यात आली.पोकलँड मशीनचा पंचनामा करून पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आली. सदर कारवाही हि चिमूर चे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार प्राजक्ता बुरांडे, तलाठी ठाकरे, कांमडे तसेच पोलिस प्रशासन चे सहाय्यक पोलीस नीरीक्षक जांभूळे आणि त्यांची संपूर्ण सहकारी यांनी मिळून संयुक्त कारवाई केली. अशीच घटना वरोरा तालुक्यात या अगोदर घडली असता असाच प्रकार तालुक्यात विविध ठिकाणी सुरू आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे अशीही मागणी जनता करु लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!