शेगाव ग्रामीण परिसरात अवैध दारूचा महापूर...
वरोरा (जगदीश पेदाम)
वरोरा तालुक्यातील शेगाव ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे जवळपास 80 ते 90 खेडी जोडलेले हे तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे परंतु मागील काही वर्षापासून परिसरातील,वडाळा, आष्टा,अर्जुनी,चारगाव,धरण कोकेवाडा,आदी अनेक गावातील समाजकंटकांनी लपून छपून अवैध दारू विक्री सुरू केली अनेकदा गावातील लोकांनी अवैध दारू विक्रीला विरोध केला तसेच सट्टा मटका व्यवसाय खुलेआम चालू असून यामुळे गावाची वाट लागुन अनेक गोरगरीब जनतेची उध्वस्त कुटुंब होत आहे...
अवैध दारू विक्रेते जनतेच्या समोर सैराट होऊन जोमाने दारू विक्री सुरू ठेवली आता तर गावात अवैध दारूचा महापूर सगळीकडे पसरलेला असल्याने गावातील लहान मुला पासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत पिणाऱ्यांची संख्या वाढलेली असल्याने गावाची शांतता भंग पावत चाललेली आहे..
दरफरोज गावात वाद भांडणे, तंटे सुरू झाले असून चौका चौकात दारू पिणारे नागरिक घाणेरडे, अशील भाषेत बोलत असतात त्यामुळे रस्त्यांनी जाणाऱ्या महिलांना,मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे..
दारू पिणारे ऐन परीक्षेच्या वेळी अश्लील भाषेत बोलत असल्यामुळे शाळेतील दहावी-बारावीची विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास करावा लागतो, तसेच अनेक कुटुंबामध्ये दारुमुळे भांडणे निर्माण होऊन गावातील जनतेला त्रास होत आहे..
शेगाव परिसरातील ग्रामीण भागात शेगाव, चिमूर, वरोरा, येथून अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात येत असून याकडे सणासुदीच्या काळात स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे सणासुदीच्या काळात विपरीत घटना घडल्यास याला जिम्मेदार कोण राहील असा प्रश्न परिसरातील महिलांकडून प्रशासनाला केला जात आहे.. वारंवार पोलीस विभागाकडे महिलांनी गावातील अवैद्य दारूबंदीचे निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई दारू विक्रेत्यावर करण्यात आलेली नाही...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!