लिव्ह इन रिलेशनशिप प्रथा कायद्याने बंद व्हावी
.......... लिव्ह इन रिलेशनशिप, डेटिंग, प्रीवेडिंग शूट या सर्व पाश्चिमात्य देशांमधील प्रथा आहेत.
पण त्यांचच आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आक्रमण होत आहे.
......या प्रथेला भारतात कोणताच सामाजिक, कायदेशीर आधार नाही तरी ही प्रथा भारतातील युवा वर्गात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. हि एक असामाजिक, अनैतिक प्रथा आहे.
.....यात एक प्रियकर व एक प्रेयसी आई वडीलांच्या विरोधात कोणतीही धार्मिक विधी न करता , कोणताही शासकीय प्रमाणपत्र न घेता पती.. पत्नी सारखे एकत्र राहतात .या संबंधांना कोणतीही सामाजिक मान्यता नाही.
.........परंतू हे संबंध अधिक काळ टिकत नाही. आर्थिक परावलंबित्व, ईगो , संशय , घरच्यांचा विरोध, ब्लॅक मेलिंग अशा अनेक कारणांमुळे यांच्यात मतभेद निर्माण होतात .
व यांच पर्यवसन भांडण, वादावादी, कोटुंबिक हिंसाचार यांत होतात .याची परिणीती ब्रेक अप, डिप्रेशन यात होत असते , कधी कधी टोकाचे भांडण होऊन खूण , आत्महत्या अशाही घटना घडतात, व आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत.
......... लग्न हे एक सामाजिक मान्यता असलेल पवित्र बंधन आहे मग ते प्रेम विवाह असो नाहीतर अरेंज मॅरेज असो, पण तेच लिव्ह इन रिलेशनशिप हे एक बेकायदेशीर, असामाजिक, अपवित्र बंधन आहे.
..........परंतू लिव्ह इन रिलेशनशिप चा न्यू जनरेशन वर खूप वाईट परिणाम होतो. ते या सेलिब्रिटींना आपला आदर्श मानतात न त्यांचच अनुसरण करतात .
.........या प्रथेमुळे आईवडिलांच खुप नुकताच होत असते . त्यांना मानसिक, सामाजिक, आर्थिक समस्यांना तोंड द्यावा लागतो. या प्रथेत बहुतेक मुलींचच जास्त नुकसान होत असते .यात मुलींच शिक्षण , करिअर पूर्ण होत नाही , ते स्वावलंबी होत नाहीत त्यांच्यात वाद निर्माण झाल्यास त्यांना त्यांचं कुटुंब स्विकारत नाही, त्या प्रियकरापासुनही दुरावतात मग अशा प्रसंगी मुली डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्ये सारख टोकाच पाऊल उचलतात त्यांना ईकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण होते.
............यात शासनाची , कायद्याची एक काळी बाजू समजत नाही . कधी कधी एखाद अविवाहित जोडप , किंवा विवाहबाह्य संबंध असलेल जोडपे जर एखाद्या फ्लॅट वर, हाॅटेल मध्ये , रिसोर्ट वर आक्षेपार्ह स्थितीत आढळले व पोलीसांना माहिती झाल व त्यांनी धाड टाकली तर पोलिस त्यांना पकडून विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करतात .
......मग हे काही सेलेब्रिटी वा ईतर प्रियकर प्रेयसी कोणतीही धार्मिक विधी न करता, कोणतंही शासकिय प्रमाणपत्र न घेता वर्षों एकत्र पतीपत्नी सारखे राहतात , तर यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही . का पोलीस यांच समर्थन करतात . हे एक आश्चर्यच, गुढ वाटते . यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. यांच्या अशा राहण्याने आजूबाजूच वातावरण दूषित होते.
.......मग ती एखादी वेश्यां असु दे , एखादी काॅल गर्ल असू दे वा लिव्ह इन रिलेशनशिप वाले असू दे सर्वांना सारखेच नियम लावायला पाहिजेत .यात भेदभाव करू नये.याचा शासनाने विचार करायला पाहिजे.
...... म्हणून हि एक असामाजिक, अनैतिक, शासन मान्यता नसलेली कुप्रथा कायद्याने बंद व्हायला पाहिजे.
.....तरच अनेक न्यू जनरेशन चया मुलामुलींचा प्राण वाचेल त्यांचं जीवन उध्वस्त होण्यापासून वाचेल व त्यांच्या आईवडिलांनाही दिलासा मिळेल .
धन्यवाद
राजू भागवत
विद्यानगर
ब्रम्हपुरी
फोन न. 9552792447
..........................................



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!