महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे जि.प.प्राथमिक शाळा, सिंताळा येथे अन्नदान संपन्न.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शनिवार दि.११ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंताळा, त.मुल येथे अन्नदान करण्यात आले*.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने *सौ गिता कोंतमवार* यांनी परिश्रम घेतले .या उपक्रमासाठी शाळेचे *मुख्याध्यापक श्री.विजय बावणे यांचे सहकार्य मिळाले तसेच शाळेच्या शिक्षिका सौ.नलिनी रणदिवे* यांनी सहकार्य केले .
*या उपक्रमाचा लाभ एकूण ६४ विद्यार्थ्यांनी घेतला* .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!