पुरोगामी महिलांचे महिलांसाठी महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीर
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती महिला मंच महिलांच्या कार्यकतृत्वाला नेहमीच सलाम करत असते.
महिलांनी महिलांसाठी महिलादिनाला रक्तदान शिबिराचे आयोजन करणारी शिक्षण क्षेत्रातीलच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत असणारी एकमेव संघटना आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती महिला मंच या संघटनेच्या सदस्या नेहमीच महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदानासारखे महादान करतात आणि नेहमी सामाजिक दायित्व निभावत असतात.
100/125km अंतरावरून महिला दिन कार्यक्रमाला येणाऱ्या आमच्या भगिनी अचानक म्हणतात मला रक्तदान करायचे आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील समाधान सांगून जात, समजात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडत आहोत. रक्तदानासारखे महादान नाही.
समाजातील बहुतेक महिलांमध्ये त्या नौकरी करणाऱ्या असो की गृहिणी त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते परंतु रक्तदान करायचे असेल तर हिमोग्लोबिन प्रमाण वाढविण्यासाठी काय उपाय करायला हवे याविषयी जनजागृतीचे कार्य सुद्धा महिला मंचच्या माध्यमातून होत असते.
दरवर्षी महिला रक्तदात्यांच्या प्रमाणात वाढ होत असते हे विशेष.
मागील 10वर्षापासून महाराष्ट्र पुरोगामी पुरोगामी महिला मंच राज्याध्यक्ष डॉ. सौ अलका ठाकरे यांच्या नेतृत्वात व श्रीमती चंदाताई खांडरे राज्य सल्लागार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती महिला मंच, चंद्रपूर महिला दिनाचे औचित्य साधून महीलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. सातत्याने रक्तदानाचे महत्व आणि रक्तदान केल्याने होणाऱ्या फायद्याविषयी मार्गदर्शन करीत असतात.
सदर रक्तदान शिबिरांमध्ये चिमूर, मूल, ब्रम्हपुरी भद्रावती,चंद्रपूर या तालुक्यातील पुरोगामी महिला मंच सदस्या सहभागी होत्या.
महिला मंच जिल्हाध्यक्ष सौ शालिनी खटी, जिल्हा नेत्या सौ सुनीता पोहाने, जिल्हा सरचिटणीस कु. पौर्णिमा मेहरकुरे, सौ. पूनम सोरते, कु. ज्योती खरकाटे, माधुरी निंबाळकर, सुलक्षणा क्षीरसागर, अर्चना येरणे, दीक्षा करमे, लता मडावी, सिंधू गोवर्धन, वैशाली दीक्षित या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा महिलादिन रक्तदान शिबिर संपन्न झाले.
काही कारणांमुळे या वर्षी इच्छा असूनही ज्या महिलांना रक्तदान करता आले नाही त्यांनी पुढील वर्षी महिला दिनाला रक्तदान करण्याचा संकल्प केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!