आंबेनेरी येथे अवैध रित्या दिवस - रात्र होतो दगडी कोळशाचा काळा बाजार
अनेक कोळशाच्या ट्रक मधून कोळसा खुलेआम उतरवला जातो
पोलीस प्रशासनाच्या आर्शिवादानेच हे सर्व सुरु
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालुक्यातील मौजा आंबेनेरी येथे काही दिवसा पासुन भर दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक कोळसा वाहतूक करणारे ट्रक कोळसा खुलेआम आंबेनेरी येथे उतरवीत जात आहे.या ठेकेदाराचा ठिय्या या अगोदर भिसी येथे होता.WCL च्या अधिकाऱ्यानी भिसी येथील ठिय्या वर धाड टाकुन चौकसी केल्याची माहीती सुत्रा कडून प्राप्त होताच भिसी येथे चोरीच्या कोळशाची खळबळ जास्त प्रमाणात वायरल झाल्याने ठेकेदाराने हा ठिय्या भिसी मधून आंबेनेरी येथे स्थलांतर केले.या ट्रकमुळे एक अपघात शुद्धा झाल्याची चर्चा होत आहे. आर्थिक चिरी मिरी करून हे प्रकरण दाबण्यात आले.हा सर्व प्रकार पोलीसाच्या आर्शिवादाने सुरु असून अवैध कोळसा विक्री हे नविन उद्योग सुरू झाल्याचे दिसुन येत आहे.नियमाचे असेच उल्लंघन होत राहतील तर पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी यांच्यावर जनतेचा विश्वास राहणार नाही. म्हणून या सर्व प्रकारावर योग्य त्या प्रकारे गोपनीयता बाळगून घटनास्थळ गाठून वरीष्ठ अधिकाऱ्या कडून कसून चौकसी करण्यात यावी अशी स्थानिक नागरीकांकडून मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!