ग्रामीण भागातून "आट्या पाट्या' व घाणमाकड हद्दपार....
शेणाच्या चाकोल्या होत आहे इतिहासजमा...
वरोरा.... (जगदीश पेंदाम)
फाल्गुन महिना सुरू झाला की होळी सणाची चाहूल लागते आणी निसर्गात पळसाच्या झाडाला लाला, शेंद्ररी रंगाची फुले लागायला सुरुवात होत असुन ग्रामीण भागात होळी सण आला असं नागरिक समजू लागतात होळी साजरी करण्याच्या तयारीला सुरुवात करत असतात या तयारी सोबतच आट्यापाट्या घाण माकड व गाई म्हशीच्या शेणा पासून बनवलेल्या विविध प्रकारच्या चाकोल्या सुद्धा नामशेष झालेल्या आहे..
आजच्या संगणक व मोबाईलच्या युगात विविध प्रकारचे खेळ खेळण्यात बिजी असलेल्या मुलांना पारंपरिक खेळाच्या विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.फाल्गुन महिन्यात पंधरा दिवसापासूनच होळीचा सणाच्या तयारीला लागायचे लोक होळीत जाळण्यासाठी शेणापासून तयार करण्यात आलेल्या चाकोल्या व लाकडाचा वापर करायची त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे अपायकारक जंतूचा नायनाट होऊन मानवी आरोग्यास कोणत्याच प्रकारची हानी होत नसल्याचे वैज्ञानिक कारण होते..
तसेच ग्रामीण भागातील मुले जंगलात जाऊन पळसाचे वक्राकार लाकूड आणून त्याची घाण माकड बनवायचे लाकडाच्या गोल खंबा जमीत गाळून त्याच्या टोकावर वक्राकार लाकडाला मधोमध ठेवून घाण माकड फिरवत असायचे यालाच आट्यापाट्या हा खेळ म्हटले जात होते..
आजच्या परिस्थितीत खेड्यापाड्याची शहरीकरण होत असून ग्रामीण भागातील खेळ हद्दपार झाली आहे काळानुसार बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे काही व्यक्ती होळीमध्ये टायर जाळून प्रदूषण करत असतात..
आज परिस्थिती सगळीकडे बदलली असून होळी म्हणजे पाण्याचा खेळ म्हणून याकडे पाहिले जाते तर काही नागरिक चक्क टू व्हीलर,चारचाकी वाहने, डीजे लावून होळी साजरी करतात व हजारो लिटर पाणी होळी सणाच्या दिवशी वाया घालवत असतात......



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!