घरकुलाचे आमिष दाखवून महिलांना हजारोने लुटले
घरकुलाचे आमिष दाखवून महिलांना हजारोने लुटले
- सागरने लावला पांढरसराडच्या महिलांना आर्थिक चुना
सावली (विजय कोरेवार) - "घर देता का घर" म्हणत महिला घरकुलच्या शोधात असतांना सागरने हेरले. घरकुल मंजूर करून हातात अडीच लाखाचे चेकही सागरने दिले. बांधकाम सुरु करायच्या अगोदरच चेक मिळाल्याने महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला पण जेव्हा बँकेत चेकची रक्कम काढायला गेले तेव्हा खात्यात रक्कमच नसल्याने लक्षात आले की आपली फसवणूक झाली. हा फसवणुकीचा प्रकार सावली तालुक्यातील पांढरसराड येथील असून फसवणूक करणारा भामटा मुलचा रहिवासी सागर बंडूजी पाल आहे.
लोकांच्या अज्ञानतेचा, लोभाचा कुणी कसा फायदा घेईल सांगता येत नाही. त्यातही निवारा ही मूलभूत गरज असल्याने कुणी घरकुलचे स्वप्न दाखविल्यास त्यात बळी पडणारच. सागर बंडूजी पाल हे आदिवासी वस्तीच्या पांढरसराड गावात पोहचले. सागरकडे बोलण्याची उत्तम कला असल्याने महिलांना हेरले व नवीन योजनेत अडीच लाखाचे घरकुल आपणास मिळणार असल्याचे सांगत चक्क अडीच लाखाचा चेक हातात दिला. चेक हे युनियन बँक मुल, Esaf फायनान्स बँक नागपूर येथील असून बंडूजी कान्हूजी पाल या नावाने आहे. चेकचे पेज कमी गेल्यानंतर तीन व्यक्तींना सात लाख पन्नास हजारचे चेक दिले. प्रत्येकी 500/ 1000 रुपये जवळपास 40 कुटुंबाकडून जमा केले. चेकची रक्कम काढून घराचे बांधकाम करण्याचे स्वप्न पाहत जेव्हा बँकेत गेले तेव्हा खात्यातच पैसे नसल्याने भ्रमनिरास होत परतावे लागले. संपर्क केला तर फोनच उचलत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले आहे. परंतु कष्टकरी महिला असल्याने पोलिसांच्या झंझटीत पडायचे नसल्याने पोलिसात तक्रार झाली नाही.
अशा भामट्यांपासून सावध राहण्याच्या सूचना प्रशासन देत असतानाही लोक लोभापायी आपली फसवणूक करून घेत असल्याने गावातील जागरूक नागरिकांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!