जागतिक महिला दिनाचे आयोजन ५ मार्चला

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन पवनी, सहयोगी संस्था तर्फे आज दिनांक ५ मार्च २०२३ रोज रविवार ला सकाळी १० वाजता गभने सेलिब्रेशन एंड लॉन पवनी येथे जागतिक महिला दिनाचे निमित्ताने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विविध वस्तुंचे/गृहउद्योगाविषयी माहिती देणाऱ्या स्टॉल ची प्रदर्शनी,विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल,मनोरंजनातून प्रबोधन, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम. सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्थानिक महिलांचा गुणगौरव.महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. सहयोगी संस्था 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोवनोन्नती अभियान पवनी,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान पवनी , नवीदिशा लोकसंचालित साधन केंद्र(माविम) पवनी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पवनी आरोग्य विभाग पवनी लोकमत सखी मंच पवनी,शिक्षण विभाग पवनी आहेत.तरी या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!