पळसगाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा निबंध स्पर्धा सम्पन्न
तलोधि(बा ):
नागभीड तालुक्यातील मौजा: पळसगाव खुर्द येथील कृषीतंत्र विद्यालय येथे तालुका कृषी अधिकारी कु. पी एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली "आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023" साजरे करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "दैनंदिन आहारातील तृणधान्याचे महत्त्व" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना कृषी सहाय्यक दाडगे यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमात 'तृणधान्य पिकाविषयी' माहिती कृस ए के शिरसाठ यांनी दिली तर 'तृणधान्येचे मानवी आहारातील महत्त्व' या विषयावर जनकापुर साजाचे कृस सी एस दाडगे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे कार्यक्रमातील सर्व उपस्थितांना तृणधान्याचे महत्त्व समजण्यासाठी कृषी विभागामार्फत बाजरीची भाकरी व बेसन, चटणीचे आहार देण्यात आला. या कार्यक्रमास पळसगावचे सरपंच श्री नीरज सीद्दमशेट्टीवार प्रगतशील शेतकरी श्री. बाजीराव निकोडे, श्री. समीर मडावी तसेच विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक कुमारी पी आर गवई यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!