व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीला पोलिसांनी केली अटक
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - स्थानिक आझाद चौक पवनी येथील राहुल चरण कावळे वय २५ वर्षे दारूच्या व्यसनाच्या आधीन असलेला पती याच्या मारझोड व मानसिक छळाला कंटाळून दिनांक २६/०२ /२०२३ रात्री अकरा वाजता औषध प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक हि विवाहा अगोदर पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील रहिवाशी होती स्नेहा हीने दिनांक. २६/०२/२०२० ला राहुल कावळे रा. आझाद चौक पवनी यांचेसोबत प्रेमसंबंधातुन लग्न केले होते तीला पतीपासून अंदाजे एक वर्षांची मुलगी कु. श्रेयांशी आहे, त्यानंतर काही दिवसाने पती राहुल दारु पिऊन पत्नी स्नेहाला आईवडीलांकडुन शेतीचा हिस्सा माग असे बोलून मारझोड करीत होता. त्याबाबत सासरे हे राहुल याला समजावुन सांगत होते. दिनांक २३/०२/२०२३ ला यातील स्नेहाच्या चुलत भावाचे लग्र असल्याने स्नेहा व राहुल व व मुलगी कुमारी श्रेयांशी असे मांडवाचा कार्यक्रम असल्याने पाहुणे म्हणुन आले असता पती राहुल याने मृतक स्नेहाशी घरी भांडण करुन स्नेहाला दोन थापडा मारल्या होत्या. पती मला मानसीक त्रास देऊन मारहाण करतात त्या त्रासामुळे एखादे दिवशी मी जीव देईन असे बोलले होते.आरोपीने राहुल ने पत्नी स्नेहा हिला आपले वडीलाकडुन शेतीचा हिस्सा माग असे म्हणुन नेहमी मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने दिनांक.२६/०२/२०२३ ला विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान ती मरण पावली असे मृतक स्नेहाच्या वडिलांच्या रिपोर्टवरून पवनी पोलिसांनी सदरचा गुन्हा नोंद केला. व पतीला अटक करून पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!