कॅन्सर ग्रस्त रुग्णास मदत न करता स्थानिक आमदारांनी दाखविली पाठ

उप संपादक
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील राकेश भालचंद्र गायकवाड राहणार चिमुर  ( वडाळा पैकू ) सदर व्यक्ती चिमुर येथील रहिवासी आहे.यास मुखाचा कर्क रोग झालेला असून दि. 03/3/2023 ला त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर आणि आर्थीक परिस्थिती फार ढासळली असल्याने मदत म्हणून रुग्णाच्या ताई व पत्नीने आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या कडे मदत मागितली. त्यांचे चिमूर येथील स्थानिक माजी नगर सेवक सतीश जाधव यांनी उप जिल्हा रुग्णालयात येऊन चौकशी केली व राकेश गायकवाड यांच्या पत्नी सौ आरती राकेश गायकवाड आणि बहीण सौ मीना रवींद्र खडसे यांच्याशी बोलने केले. परीस्थिती बेताची आहे आम्हाला मदत हवी आहे हे सांगीतले. हे सर्व ऐकूण सतीश जाधव यांनी आम्ही मदत करू असे सांगितले. रूग्नाला तातडीने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास सांगून ऍम्ब्युलन्स मध्ये डिझेल टाकून रवाना केले.नागपूर येथील कॅन्सर रुग्णालयात रुग्णास भरती केल्या नंतर त्यांच्या पत्नी ने सतीश जाधवशी संपर्क केले असता आज आमचा मानुस येणार आहे. असे सांगून तब्बल 8 दिवस वाट बघीतली पन अजूनही कुठलीही मदत रुग्णास मिळाली नाही जवळ असलेले काही पैसे ते सुद्धा उपच्यारात खर्च  झाले आठ दिवसा मध्ये तब्बल 12000 रुपये खर्च झाले असून कुटुंबीयांनवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.एकिकडे लाखोंची जनहितार्थ कामे विकासात्मक आराखडा तयार करून विविध प्रकारचे भूमिपूजन आणि रुग्णांना सुद्धा मदत केली जाते. रुग्णालयात काही मदत हवी असल्यास मला संपर्क करा असे ठिक - ठिकाणी अनेक शासकीय कार्यालयात फलक लावली असून  मृत्युच्या दारात उभे असलेल्या रुग्णाकडे पाठ दाखविली याची संपूर्ण चिमूर शहरात चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!