अंगणवाडी ताईं धडकल्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

सात तालुक्यातील अंगणवाडी ताईचा समावेश

बेमुदत संप सुरूच राहणार

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी  व इतर मागन्यासाठी सोमवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर पंचायत समिती एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला या मोर्चा चे नेतृत्व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांनी केले.          कोरोणा काळात कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत ताईकडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे निराश अंगणवाडी ताई कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागन्यासाठी मोर्चा एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा चे रूपांतर सभेत झाले.अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी, माधुरी रमेश विर  चिमुर प्रभा विश्वनाथ चामटकर  नागभीड ललीता सोनुले   संयोगीता गेडाम शोभा मेश्राम सिंदेवाही पुष्पा ठावरी  वरोरा यांनी अंगणवाडी ताई विषयी मनोगत व्यक्त केले. एकात्मीक बाल विकास प्रकल्प  अधिकारी  पुनम गेडाम यांनी निवेदण स्विकारले. त्यानंतर नायब तहसीलदार तुळशीदास कोवे  यांना अंगणवाडी शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनाची प्रत चिमूर एकात्मीक बाल विकास प्रकल्प मार्फत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास आयुक्त मुंबई, व तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवीन्यात आली.मोर्चात चिमूर नागभिड ब्रम्हपूरी भद्रावती वरोरा सिंदेवाही मुल या सात तालुक्यातील हजारो अगंणवाडी ताई कर्मचारी यांनी सहभाग दर्शवीला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!