अवघड क्षेत्रातील पदे नवीन भरती प्रक्रियेने भरा सहाव्या राऊंडमधून ५३प्लसला वगळण्याची पुरोगामीची मागणी
----महाराष्ट्र राज्यातील जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्र रिक्त पदांसाठी बदलीपात्र यादीतून संवर्ग 1 च्या शिक्षकांना वगळण्यात यावे व अवघड क्षेत्रातील पदे नवीन भरतीतून भरण्याची मागणीचे नुकतेच इमेलद्वारे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय, अध्यक्ष बदली प्रक्रिया गट महाराष्ट्र शासन पुणे, यांच्याकडे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने नुकतेच पाठविण्यात आले.
सन 2022 ची जिल्हातंर्गत बदली प्रक्रिय अंतीम टप्प्यात आली असून अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरील संदर्भी- दि. 22/02/2023 रोजी जिल्हा निहाय प्रसिध्द झालेल्या बदलीपात्र यादीमध्ये 53+ वय असलेल्या विविध कारणांनी संवर्ग 1मध्ये असलेल्या शिक्षकांचाही समावेश दिसत आहे. 1खरे पाहता वयोमानानुसार अथवा विविध कारणांनी संवर्ग 1 मध्ये समावेश झालेल्या शिक्षकांना दूर्गम / गैरसोयीच्या शाळेत काम करणे अशक्य असल्याने संवर्ग मधील सर्व शिक्षकांना बदल प्रक्रियेमध्ये प्रथमप्राधान्य क्रम देण्यात आला आहे. तसेच संवर्ग 1 मधील ज्या शिक्षकांना बदली नको आहे त्यांना नकाराधीकारही देण्यात आला आहे.असे असताना अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात काल प्रसिध्द झालेल्या बदली पात्र शिक्षक यादीमध्ये संवर्ग च्या शिक्षकांचा समावेश करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.
नुकतीच प्रसिध्द झालेली बदलीपात्र यादीतून संवर्ग मधील शिक्षकांना वगळण्यात यावे अथवा संवर्ग 1 सदरची बदलीपात्र शिक्षकांची यादी रद्द करण्यात यावी .
तसेच जिल्ह्यात आजरोजी जेवढी पदे निव्वळ रिक्त आहेत त्या प्रमाणात सर्व तालुक्यात समानीकरणासाठी प रिक्त ठेवून उर्वरीत सर्व निव्वळ रिक्तपदे बदलीपात्र शिक्षकांमधून भरली जाणे अपेक्षीत असताना बदल प्रक्रियेचे सर्व टप्पे संपूनही अजून निव्वळ रिक्तपदे कशी काय शिल्लक राहिली आहेत हा संभ्रम निर्माण झाला आहे. तरी यापुढील बदली टप्पे पूर्णतः थांबवून आज रोजी शिल्लक असलेली सर्व निव्वळ रिक्त पदे ही भरती अथवा अन्य नियुक्तीमधून भरण्यात यावी. या मागणीचे निवेदन राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीचे पाठविल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे , जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, सरचिटणीस संजय चिडे,कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे,सचिव सुरेश गिलोरकर, लक्ष्मण खोब्रागडे यांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!