१६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू
मृतक मुलाच्या कुटुंबातील लोकांवर कोसळले दुःखाचे डोंगर
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - पवनी तालुक्यातील वलनी (चौरास) येथे १० व्या वर्गात शिकत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक.२४ फेब्रुवारी २०२३ घडली.
प्राप्त माहितीनुसार मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे श्रेयस युवराज जीभकाटे असे नाव असून श्रेयस हा आपल्या मित्रासोबत वैंनगंगा नदी पात्रात आंघोळीकरिता गेला असता ही दुर्दैवी घटना दुपारी १२ वाजता च्या सुमारास घडली.श्रेयसच्या पाठीमागे त्याचे आई,वडील,मोठा भाऊ आणि आप्त परिवार असून त्याच्या या दुर्दैवी मृत्युने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.त्याचप्रमाणे वलनी (चौरास) या गावामध्ये शोककळा पसरली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!