सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या आरोपीला मुद्दे माला सहित अटक

सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या आरोपीला मुद्दे माला सहित अटक

तळोधी बा: 
       नागभीड तालुक्यातील  तालोधी बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील  आंबोरकर यांच्या शोभा किराणा  दुकानातून सुंगधीत इगल तंबाखू आणून विक्री करीत असल्याचे गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना माहिती होताच बुधवारी रात्री ८.३० वाजता तळोधी बा. पोलीस यांच्या सहकार्याने सावरगाव येथील व्यावसायिक विनोद रामराव आंबोरकर वय ३५ वर्ष यांच्या घराची झडती घेतली असता घरासमोर असलेल्या तनसीच्या ढिगारा मध्ये पांढरे रंगाची नायलॉन चुंगळीत ४० पॉकेट इंगल तंबाखू किंमत १३६००रुपये, ६ पांढऱ्या रंगाच्या नायलॉन चुंगळीत ११० ईगल तंबाखू च्या पुढया प्रत्येकी ४० ग्रॅम किंमत ४६२००,५० पॉकेट होला सुंगधीत तंबाखू किंमत ८२००,व ९खोके मजा तंबाखू, प्रत्येक खोक्यात १०नग किंमत २१ १५० रुपये एकूण ९० डब्बे ५० ग्रॅम प्रमाणे किंमत ८९२५० रुपयांच्या माल जप्त करण्यात आले. सदर तंबाखू जनसामान्यांच्या जीवितास हानिकारक असताना माल बाळगून विक्री केली जात असल्याने सदर व्यावसायिक विनोद आंबोरकर यांच्या विरोधात कलम १८८,२७३भांदवी सहकलम २६(२) (१) ,डी,५९अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अगोदर सुध्दा तळोधी बा. पासून 2किलोमीटर अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली होती. तसेच पुन्हा तळोधी बा. अप्पर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुंगधीत तंबाखू ची विक्री केली जात असल्याचे बोलले जाते आहे. या भागात मानवी जीवनास हानी करणारे व्यावसायिक यांच्या वर कारवाई करण्याची मागणी जनसामान्य वर्गातून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!