संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सव संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि .५ फेब्रुवारी २०२३ ला राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीच्या वतीने श्री.संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. रामचंद्र अवसरे माजी आमदार भंडारा, उद्घाटक विलासभाऊ काटेखाये जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, तसेच प्रमुख पावणे कवी धनंजय मुळे सर लाखांदूर, देवराजभाऊ बावनकर अध्यक्ष व्यापारी संघटना पवनी, भूषण वाकडीकर सहाय्यक अभियंता महापारेषण भंडारा,सुधीर खोब्रागडे माजी नगरसेवक पवनी, बालूभाऊ मुंडले सामाजिक कार्यकर्ते, ॲड. राहुल बावणे, योगेश लोखंडे, श्याम पंचवटे सर लाखनी,हिरेन्द्र सिंगनजुडे सर लाखनी, प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
प्रथमतः सर्व मान्यवरांच्या हस्ते समतादीप प्रज्वलन करून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला व महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबाजी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार समाज बांधवांना उद्बोधन करताना ॲड. रामचंद्र अवसरे माजी आमदार यांनी समाजाप्रती व नवयुवकांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बल आत्मसात करावे व समाजाच्या तसेच वैयक्तिक प्रगती करावी असे विचार व्यक्त केले. देवराज बावनकर सर यांनी चर्मकार समाजाबद्दलची अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे हा समाज फार वर्षांपूर्वी देशात सौहार्द पूर्वक एकोप्याने नांदत होता हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले.व कार्यक्रमाचे उद्घाटक विलास काटेखाये यांनी चर्मकार समाज व संत रविदास महाराज यांचे विचार संविधानाला धरून आहेत पोषक आहेत राष्ट्रपुरुष कोणत्या एका धर्माचे जातीचे नसतात तर ते सर्वव्यापी सर्वांचेच असतात असे विचार व्यक्त केले. भूषणजी वाकडीकर यांनी समाजाप्रती होतकरू तरुणांना मार्गदर्शन केले शैक्षणिक कार्यात अडचणी आल्यास त्या सोडविण्याकरिता मी तुमच्या सोबत आहे असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कवी धनंजय मुळे सर यांनी गुरु रविदासाचा जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकले समाज बांधवांना चर्मकार समाजाचा शाश्वत इतिहास सांगितला व शेवटी गुरु रविदास यांच्या बद्दलची स्वलिखित कविता सादर केली.
संत रविदासा तू ध्रुवतारा या जगाचा!संत रविदासा तू शील बुद्धांच्या तत्त्वाचा!
यानंतर श्याम पंचवटे सर,योगेश लोखंडे, धनराज सिंहगडे यांनीही समाज बांधवांना उद्बोधन केले. याच कार्यक्रमात लहान सहान बालगोपालांनी आपल्या वाणीतून गुरु रविदासाबद्दल अभिप्राय व्यक्त केलेत व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून विजेत्या आलेल्या मुलांना पारितोषिक ॲड. राहुल बावणे आणि पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला मूर्त रूप देण्याचे काम राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले उत्तरार्धात गुरु रविदास जयंती निमित्ताने पवनी शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. व अंततः गोड जेवणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला बहुसंख्य समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष सुरेशजी अवसरे यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड.विद्यानंद बनारसे यांनी केले व आभार प्रदर्शन संघर्ष अवसरे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजातील संघटनेचे अध्यक्ष शेषराज अवसरे, उपाध्यक्ष शैलेश वाकडीकर,सचिव सुरज अवसरे, सहसचिव होमदेव वाकडीकर, कोषाध्यक्ष शरद लोखंडे, आणि सदस्य दीपक बनारसे,अजय वाकडीकर, गणराज वाकडीकर, प्रशांत लोखंडे,पवन वाकडीकर, कार्तिक वाकडीकर, श्रीहरी अवसरे,मोरेश्वर वाकडीकर,सोहम वाकडीकर,गणेश वाकडीकर, मोहित वाकडीकर,आदेश वाकडीकर,प्रकाश अवसरे, हिमांशू वाकडीकर, विजय वाढई या सर्व युवकांनी आपले योगदान दिले अशा प्रकारे गुरु रविदास जयंती साजरी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!