बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे वार्षिक स्नेहसमेलन मोहत्सव संपन्न
मूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा सचालीत बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे EUPHORIA वार्षिक स्नेहसंमेलन 2023 चे आयोजन दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला 11.00 वाजता कन्नमवार सभागृह मूल येथे करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ऍड. बाबासाहेब वासाडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, मूल, मुख्य अतिथी श्री अजय पाठणकर सर मुख्य अधिकारी नगर परिषद मूल,श्री यशवंत पवार सर नायब तहसीलदार तहसील कार्यालय मूल, श्री सतीश बन्सोड सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मूल श्री वैभव खांडरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मूल श्री संग्रामे सर उपमुख्यद्यापक गोंडवाना सैनिकी स्कूल गडचिरोली, श्री अनिल वैरागडे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच विधार्थी प्रतिनिधी आदित्य सोनुले व विद्यार्थीनी प्रतिनिधी कु संस्कृती कटकमवार हे मंचावर विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार सर यांनी केले व विद्यार्थी व पालकांना आपल्या विद्यालया बाबत वर्षभरात घेण्यात आलेल्या शैक्षणिक व अशैक्षणिक कार्यक्रमाचा अहवाल वाचून दाखवला तसेच पुढील येणाऱ्या शैक्षणिक सत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडविण्याबद्दल आपल्या प्रस्तावनाद्वारे संकल्प केले. इतर मान्यवरांनी आपल्या भाषणाद्वारे पालक व विद्यार्थी यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करिता प्रोत्साहनात्मक स्वतः च्या जीवनावरील उदाहरण व दाखले देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वर्ग नर्सरी ते वर्ग 10 वि पर्यंतचे विद्यार्थीनी सहभाग घेतला व आपल्या समूहनृत्य द्वारे तसेच नाटिका सादर करीत पालकांना व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले व पालकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात पालकांना शाळेमध्ये घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धाचे बक्षीस वितरण वृक्ष देऊन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात पदके, पारीतोषिके व विजय चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सोबतच सर्व कर्मचारी वृदांना त्यानी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रोत्साहान म्हणून पदक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षिका कु शुभांगी मडावी,व शिरीषा मॅडपल्लीवार व विद्यालयाचे सास्कृतिक प्रभारी सौं तोषी जयस्वाल यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून चित्रकला तसेच नृत्य शिक्षक श्री. प्रणित नमुलवार सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यानी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुहीना सय्यद शिक्षिका यांनी केले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्टगानाने झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!