मॉडेल ग्रामपंचायत हिरापूर येथील सरपंचावर अविश्वास ठराव पारित...



शेगाव (जगदीश पेंदाम)
चिमुर तालुक्यात येत  असलेल्या हिरापूर येथील मॉडेल ग्रामपंचायतचे सरपंच मंदा पंचवटे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला असून त्यांच्या विरोधात सात, तर ठरावाच्या बाजूने दोन मत पडलेले आहे...
हिरापूर येथील सरपंच मंदा पंचवटे यांच्यावर शासकीय निधीचा विनीयोग करून अपरातफर करणे ग्रामपंचायत कमिटीला विश्वास न घेता मनमर्जीनुसार कारभार करणे ग्रामपंचायत कमिटीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे आदी विषयावर त्यांच्यावर आरोप ठेवले होते  या विषयानुसार त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता बुरांडे यांनी अविश्वासाचे नोटीस देऊन मंगळवारी सभा आयोजित केली होती या सभेत सरपंच यांच्या बाजूने दोन मत तर विरोधात सात मत पडल्याने मंदा पंचवटे सरपंच पदावरून पाय उतार झालेले आहेत विरोधी गटांमध्ये उपसरपंच मंगला मुनघाटे ग्रामपंचायत सदस्य वामन डांगे दीपक नगराडे गुणवंत ढोक बंडू पोहनकर मंदा उरकुडे सविता बावनकर यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान केले आहे  अविश्वास ठरावाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!