नगर परिषद प्रशासनाने नागरिकांसाठी रस्ता मोकळा करुन द्यावा.नागरिकांची विनंती

नगर परिषद प्रशासनाने नागरिकांसाठी रस्ता मोकळा करुन द्यावा.नागरिकांची विनंती             मुल:- प्रतिनिधी 
शहरातील जुन्या वस्तीमधील राहणा-या व्यक्तीचा येजा करण्याचा रस्ताच काही स्वार्थी लोकांनी  कुंपण करुन बंद केल्याने जुन्या वार्डतील नागरीकांची मोठी अडचण झाली आहे. त्यांनी या समस्येतून सुटका व्हावी म्हणून नगरपरीषद मूल कार्यालयाचे दार ठोठावले ,परंतू कोणीही दखल घेतली नाही.
जुन्या रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या जुन्या वस्तीमधील पठाण यांचे घरासमोरील विश्राम गृहाजवळरील रोडलगात घर आहे. त्यांच्या घरा समोरून नागरिकांना येजा करण्याकरीता 12 मीटरचा अधिकृत रस्ता आहे. परंतु  या रस्तावर काहींनी अनधिकृतरित्या पहिले कुंपण करुन , वस्तू ठेवून विटा-मातीची,आजूबाजूला सागाचे झाड लावून हा रस्ताच बंद करून हडप केला आहे. याबाबत परिसरातील जाणारे येणारे नागरिकांनी वारंवार निवेदन,उपोषण बसण्याचा ईशारही नगरपरीषद  प्रशासन मूल यांना  दिले असता आज पर्यंत कानडोळा करीत आहेत त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. लक्षही दिले नाही. आपली हद सोडून रस्त्यापर्यंत अतिक्रमण केल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना खुल्या प्लॉट वरून जावे लागत आहे…शहरातील मुख्य मार्गावर आणि विश्रामगृह बांधकाम विभागासमोरील असलेल्या भूखंड क्रमांक ९४९ आणि ९४८, ९३८, ९४७ दरम्यान रस्त्यावर अवैध विटमातीचे कुंपण  नगरपालिकेच्या  परवानगीशिवाय  बांधण्यात आली आहे. नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतआहे. त्यामुळे सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, याबाबत नगरपालिकेकडे अनेक वर्षांपासून अवैधरीत्या केलेल्या अतिक्रमणाची तक्रार केली होती. मात्र हो आम्ही बघतो असेच उत्त्तर तक्रार कर्त्याणा देण्यात आले. नगरपालिकेद्वारे अद्यापही ठोस कारवाई केलेली नाही. करीता  मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीरतेने  दाखल घेऊन अतिक्रमण हटविण्यात यावे, आणि नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी तथा विनंती नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!