रमाईचा त्याग हीच महिलानसाठी ज्ञानाची शिदोरी होय - प्रकाश मेश्राम ( अध्यक्ष मूकनायक फाउंडेशन चिमूर )


उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - रमाई जयंती निमित्य अनेकांनी आपली विचार व्यक्त केली असून चिमूर जवळ असलेले खापरी धर्मु येथे दि.7 फेब्रुवारीला तथागत बौद्ध पंच कमेटी मंडळ व बौद्ध पंचकमेटीच्या वतीने रमाई जयंती  व समता सैनिक दलाचे उदघाटन असा एकत्र कार्यक्रम आयोजित केला प्रत्येक यशस्वी पुरुषा च्या मागे स्त्रीचा हात असतो,शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात परस्त्रीला सन्मानाचा दर्जा दिला आहे ,एवढेच नाही तर "मुलापेक्षा मुलगी बरी ,प्रकाश देते दोन्ही घरी " हे विधान प्रकर्षाने मांडून अतिथी म्हणून संबोधित केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष - बार्टी संस्था पुणे समतादूत प्रज्ञाताई राजूरवाडे,उदघाटक-समता सैनिक दल दीक्षा भूमी नागपूर संयोजक घनश्याम फुसे अतिथी - सुभाष पेटकर चिमूर, अतिथी - जितेंद्र घोडेस्वार समता सैनिक दल नागपूर,अनिल भागे नागपूर, सुनील शेंडे सर नागपूर, धनमाला गोंडाने नागपूर ,चुटे सिस्टर प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी .सदर मान्यवर विचार मंचावर उपस्तीत होते .माता रमाई व थोर महापुरुषांच्या तथागत बुद्ध व डॉ. बासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला दिप प्रजवलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते यावर प्रज्ञा ताई राजूरवाडे यांनी अध्यक्षीय विचार मांडले ,तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशवितेकरिता समता सैनिक दल मुख्य भूमिका होती यावर उदघाटक घनश्याम फुसे नागपूर यांनी आपले विचार व्यक्त केले व समता सैनिक दल शाखा निर्माण केली, त्यात सर्वांनी सहभाग दर्शविला कार्यक्रमाकरिता सर्व उपासक उपासिका व गावतील बहुसंख्येने नागरीक उपस्तीत होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीता प्रकाश मेश्राम यांनी केले. तर आभार - ताजुल मेश्राम यांनी मानले व बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!