पोतरा नदीच्या पात्रामध्ये वाघ मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागात उडाली खळबळ.....



शेगाव... जगदीश पेदाम

  चंद्रपूर – वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक वाघ (नर) मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे..
सदर घटना शनिवारी दुपारी चार
वाजताच्या दरम्यान उघडकीस आली असुन संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मौका पंचनामा करून मृत वाघ शवविच्छेदनासाठी टीटीसी चंद्रपूर येथे पाठविले आहे..
अधिक माहितीनुसार चंद्रपूर (वरोरा) – वर्धा ( हिंगणघाट) सीमेवरील पोतरा नदीपात्रात शनिवारी दुपारच्या सुमारास वाघ मृतावस्थेत आढळला. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला ती जागा वनपरिक्षेत्र हिंगणघाटच्या हद्दीत आहे की वरोऱ्याच्या, असा संभ्रम सुरुवातीला निर्माण झाला. नंतर या विषयावर बराच वेळ झाल्यानंतर घटनास्थळ हा वरोरा वनपरिक्षेत्रात असल्याचे कळले, वर्धा व वरोरा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संयुक्त पंचनामा केला आहे घटनास्थळ मुख्य मार्गावरून  दुर असल्याने वाघाला तिथून काढण्यासाठी बरीच मेहनत  करावी लागली असुन शेवटी, रात्री उशिरा शवविच्छेदनाकरिता मृत वाघ टीटीसी, चंद्रपूरला रवाना करण्यात आले वाघ नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरणाविषयी वेगवेगळ्या  संशय,येत असुन नागरिकांच्या म्हणण्यानुसार विद्युत करंट लागल्याने वाघ थोडं अंतर चालून नदीपत्रात पडला व मरण पावला असावा तर काही  नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाघ अज्ञातस्थळी मेला नंतर त्याला नदीत पात्रता फेकला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे..
सवविच्छेदनाच्या अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अधिक तपास वनसंरक्षक (तेंदू) निखीता चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, वनरक्षक नेवारे,केजकर, आदी करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!