कुशल कामाचे 84 लाख 48 हजार अखेर मिळाले श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांच्या प्रयत्नाला यश


 
पालक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे प्रविण चिचघरे यांनी मानले आभार

पोंभूर्णा/ प्रतिनिधी 


पोंभुर्णा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने रोहयो अंतर्गत अकुशल कामासाहित कुशल कामे करवून घेतली आहे.  मात्र पुरवठादारांना साहित्य पुरवठ्याचा एकही पैसा न मिळाल्याने ग्रामपंचायतच्या विकास कामावर विपरीत परिणाम होत असल्याने श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांनी थेट मंत्रालयात धाव घेतली. चिचघरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधिर मुनगंटीवार, तसेच रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपाणराव भुमरे यांची मंत्रालयात भेट घेऊन तालुक्यात रोजगार हमी योजनेचा कुशल कामाचा निधी मंजूर करून कुशल कामे पूर्ण करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीना थकीत असलेला निधी तात्काळ देण्यात यावा  अशी मागणी निवेदनातून केली होती.

कुशल कामाचा निधी न दिल्याने याचा थेट विकास कामावर परिणाम होत असल्याचे निवेदनात चिचघरे यांनी सांगितले होते. तसेच साहित्य पुरवठादारांना पुरवठा केलेल्या साहित्याचा एकही पैसा न दिल्याने पुरवठादार  साहित्य पुरवठा करण्यास नकार देत असून यामुळे ग्रामपंचायती विकास कामे करण्यास असमर्थ होत असल्याची बाब पालक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती 

आंबेधानोरा,उमरिपोतदार,सातारा भोसले, घटकूल, या ग्रामपंचायतीने  पांदण रस्ता खडीकरण, सिमेंट कंक्रीट रोड,  इत्यादी कामे पूर्ण केली असतांना निधी मात्र दिल्या गेला नाही असेही प्रामुख्याने.चिचघरे यांनी लक्ष वेधले होते. अखेर मुनगंटीवार यांनी निधी वितरीत करण्याचे संबंधितांना निर्देश दिले यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील मागणी केलेल्या ग्रामपंचायतींना 84 लाख 48 हजार रु. निधी आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे श्रमिक एल्गार चे अध्यक्ष प्रविण चिचघरे यांनी  आभार मानले.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!