रेती माफियास होणार आता जेल रवानगी
ट्रॅक्टर पळवून नेने पडले महागात
प्रादेशिक वनविभागाची प्रथमच सर्वांत मोठी कारवाई
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक. 04.01.2023 रोजी रात्रो 1.00 वाजताचे दरम्यान चिमुर उपक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक मेश्राम, वनरक्षक मेश्राम व वनरक्षक हजारे चिमुर नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 370 संरक्षीत वन मध्ये वनगस्तीवर असतांना वनक्षेत्रातील नाल्यावर एक ट्रॅक्टर रेती भरतांना दिसला जवळ जावून विचारणा केली असता त्यांनी त्यांची नावे 1) विकास संतोष कुळमेथे (ट्रॅक्टर ड्रायव्हर) 2) राजु धारणे 3) चंद्रशेखर नन्नावरे 4) मारोती जांभुळे 5) मधुकर बारेकर 6) श्रीकांत चीखे अशी सांगीतली.
थोडयाच वेळात घटनास्थळावर ट्रॅक्टर मालक प्रमोद किसन दोहतरे रा.शेडेगाव व कलर भोस्कर हे दोघे हजर झाले. त्याचवेळी मी वनपरीक्षेत्र अधिकारी चिमुर के.बी. देऊरकर यांना वनक्षेत्रात ट्रॅक्टर जप्त केले बाबत फोनव्दारे माहीती दिली. त्यानंतर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर मालकाने ड्रायव्हरला सांगुन जबरदस्तीने घटनास्थळावरुन ट्रॅक्टर पळवून नेले.
थोडयाच वेळात वनपरीक्षेत्र अधिकारी इतर
कर्मचा-यासह घटनास्थळी हजर झाले आणि परीसरात सगळीकडे फिरुन ट्रॅक्टरची पाहणी केली असता काळोखामुळे ट्रॅक्टर कुठेही दिसले नाही. परत सकाळी पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा नोदंबिला त्यानंतर घडलेल्या घटनेची पोलीस कार्यालय चिमुर येथे तक्रार दाखल करण्यात आली.
दुपारनंतर आरोपीने स्वताहुन वनपरीक्षेत्र कार्यालयात पळवलले ट्रॅक्टर आणले असता सदर ट्रॅक्टर जप्त करुन भारतीय वन कायदा 1972 चे कलम 33(1) ब 41 व 42 अन्वये पि.ओ.आर क्रमांक. 09143/228557 दिनांक.04.01.2022 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाहीत के.बी. देऊरकर वनपरीक्षेत्र अधिकारी चिमुर, आर.डी. मेश्राम क्षेत्र सहाय्यक चिमुर, एस. आर. ओतकर क्षेत्र सहाय्यक भिसी, श्री. यू.बी. लोखंडे क्षेत्र सहाय्यक मुरपार, नैताम वनपाल, अक्षय मेश्राम वनरक्षक चिमुर, हजारे वनरक्षक गदगाव, व गायकवाड वनरक्षक यांनी मिळून वनपरीक्षेत्र चिमुर (प्रादेशिक) व अतीक्रमण निर्मुलण खडसंगी यांचे संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
त्याचबरोबर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन ट्रॅक्टर पळवून नेल्याने चिमूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी क्रमांक.1) विकास संतोष कुळमेथे , 2) प्रमोद किसन दोहतरे यांचेवर कलम 353 , 186 , 504 , 506 , 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!