जिल्हाधिकाऱ्यांनी एस.डी.ओ सुभाष शिंदे ला दिला कारणे दाखवा नोटीस

तीन दिवसात प्रतिसाद न दिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा

जिल्हाधिकारी गौडा यांनी एस.डी.एम सुभाष शिंदे यांनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करणे अशा 7 प्रकरणांमध्ये रकम गबन करणे एका प्रकरणात अर्धी रक्कम घेऊन पूर्ण लाभ देणे तसेच तीन वर्षांपूर्वीच्या सरकारी मूल्यानुसार  किंमत घेऊन वर्ग 1 मध्ये जमीन करणे आरोपावरून कलेक्टर ने नोटीस बजावली

शासन प्रशासनाने दखल घेऊन उच्चस्तरावरून एसडीओ सुभाष शिंदे च्या कार्यालयाची दफ्तर चौकशी लावल्यास शेकडो करोडो चा भ्रष्टाचार उघड होण्याची दाट श्यक्यता

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - 7 मार्च 2022 नंतर वरोरा उप विभागांतर्गत 20 जमिनी भोगवटदार 2 मधून 1 मध्ये रूपांतरित केल्या गेल्या परंतु 7 प्रकरणांमध्ये सरकारी मूल्यांकना नुसार रक्कम चलनाद्वारे सरकारी खात्यात जमा झाली नाही आणि एका प्रकरणात मूल्यांकन मूल्य 26,73,250 आहे परंतु एसडीओ सुभाष शिंदे यांनी अर्जदारकडून फक्त 13,36,625 रुपये सरकारी खात्यात घेऊन जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करून दिली त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वरोरा येथील एसडीओ सुभाष शिंदे यांना या प्रकरणांमध्ये तीन दिवसांत स्पष्टीकरन दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तीन दिवसात उत्तर न दिल्यास एसडीओ सुभाष शिंदे वर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियम 1979 चे कलम 3 नुसार कारवाईचा इशारा देण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वी एस.डी.ओ. सुभाष शिंदे यांना ७ मार्चनंतर भोगवटदार १ मध्ये केलेल्या जमीन आदेशाची प्रत आणि भरलेल्या चलनाद्वारे शासनाच्या खात्यात जमा झालेल्या महसुलाची माहिती मागितली होती, परंतु आजपर्यंत २० पैकी ७ प्रकरणांची माहिती दिलीच नाही.एका प्रकरणात सरकारी मुल्यांकना नुसार किंमत न घेता अर्धी रक्कम सरकारी खात्यात घेऊन अर्जदाराचे काम पूर्ण करून दिले  ही बाब सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आल्याने एसडीओ सुभाष शिंदे ची चांगलीच गोची झाली सरकारी खात्यात पूर्ण रक्कम न घेता  एसडीएम सुभाष शिंदे यांनी जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा आदेश काढला आहे.  या संदर्भात एस.डी.ओ.ला 22 नोव्हेंबर 2022 रोजी आदेश पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले होते परंतु आजपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही.काही प्रकरणात भोगवटादार श्रेणी 2 मधून भोगवटादार श्रेणी 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या बाबतीत एसडीओ सुभाष शिंदे नी 3 वर्षा पूर्वीच्या जुन्या दरा नुसार सरकारी किंमत घेऊन आता नवीन आदेश पारित केले असल्याने सरकारचे नुकसान केल्याची बाब जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आली आहे त्यामुळे एसडीओला सुभाष शिंदे ला कारवाईचा इशारा दिला आहे. एस.डी.एम.सुभाष शिंदे यांच्या  कार्यालयातील भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करून शेकडो करोडो चा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची दाट श्यक्यता आहे.एसडीओ सुभाष शिंदे नी नियमानुसार शेतकऱ्यांना टॉवर भत्ता दिला नाही, रेल्वेच्या तिसऱ्या मार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीत अनियमितता असल्याची श्यक्यता आहे, वणी वरोरा रोड भूसंपादनातील अनियमितता असल्याची चरच्या आहे, महसूल विभागाने अवैध गौण खनिज प्रकरणी लावलेले दंड एसडीएम सुभाष शिंदे नी माफ करून शासन प्रशासनाला करोडोंचा फटका मारून प्रशासन विरोधी काम एसडीएम सुभाष शिंदे यांनी केले आहे म्हणून यांच्या कार्यालयाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास अनेक प्रकारची शेकडो बोगस प्रकरणे उघडकीस येण्याची दाट श्यक्यता आहे या वादग्रस्त एसडीएम सुभाष शिंदे च्या शेकडो तक्रारी वरिष्ठांना देऊनही आज पर्यंत कोणीही कारवाई करण्याची हिम्मत दाखवली नसल्याचं उघड आहे सुभाष शिंदे ची  उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!