जांभुळघाट - नेरी परीसरात पट्टेवाला वाघाची दहशत
वनविभागाला लक्ष देण्याची गरज
तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - जांभुळघाट ते नेरी जाणाऱ्या मार्गावर तसेच या परीसरात पट्टेदार वाघाची नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.या परीसरा मध्ये नागरीकाना वाघा चे नियमित दर्शन होत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे. तसेच दुचाकी ने व सायकल ने नियमित ये जा करणाऱ्या नागरीकां मध्ये सुद्धा भीती निर्माण झाली आहे. वाघा चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मानव व वाघ यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. आज तर जंगलात सोडा गावात घरात येऊन मानवावर व जनावरांवर हमला करून ठार मारण्याचे प्रकार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसुन येत आहे.एके काळी मानवाला नकक्षलवाद्याची भिती होती. पण आता तर नकक्षलवादी पेक्षा वाघ व जंगली जनावरामुळे भीती चे वातावर निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.घरा बाहेर जातानी वाघ तर भेटणार नाही ना? अश्या प्रकारची गावकऱ्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.सरकारने किंवा वन विभागाने या कडे लक्ष दिले नाही तर जंगली जनावरे यांच्यामुळे शेतकऱ्याना शेतीत पिक घेणे कटीन होणार ..? जिल्हात कुठे ना कुठे वाघाच्या किंवा जंगली जनावराच्या हल्यात हमला करून ठार मारण्याची घटना नियमित होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच जांभुळघाट या परीसरात शुध्दा अश्या प्रकारची घटना घडू नये म्हणून या साठी वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!