मूल येथे श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, भव्य शोभायात्रा समारोह आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन



प्रतिनिधी:- कु. कुमुदिनी भोयर mul

मूल शहरात दरवर्षीप्रमाणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा  2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता भाग्यरेखा सभागृह पासून मा.सा. कन्नमवार सभागृह पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

दुपारी तीन वाजता मा.सा कनमवार सभागृह येथे समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे सचिव प्रा. दिलीप चौधरी लाभणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक कबीर साधक गुरुदासजी गोहने तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाल उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक  अखिल भारतीय कुणबी समाज संघटना मूल तालुका, श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान मूल, श्री संत तुकाराम महाराज पुरुष महिला महाबचत गट मूल, राष्ट्रमाता कुणबी महासंघ महिला बचत गट मूल असून होत असलेल्या भव्य रॅली व समाज प्रबोधन कार्यक्रमास समस्त समाज बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!