दहा वर्षांनंतर मिळाले घरकुलाचे देयक
स्थानिक विहिरगाव वॉर्ड क्रमांक १६ येथील रहिवासी दिवाकर राघोजी मेश्राम यांना शासनाने २०११-१२ मध्ये तर वासुदेव वा दुर्गे यांना २०१६-१७ मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत घर बांधकामाची नगर परिषदेने परवानगीदिली. शासनाचे सर्व नियम आणि अटींचे पालन करून दिवाकर मेश्राम आणि वासुदेव दुर्गे या दोघांनीही घरकुल बांधले. त्याकरिता शासनाच्या वतीने स्थानिक नगर परिषद प्रशासनाने त्यांना बांधकामाचे प्रारंभीक देयक दिले.
परंतु, अंतीम देयक देण्यास अडचणीचे कारण सांगून टाळाटाळ केली जात होते. त्यामुळे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे दोन्ही लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले. बिलाची रक्कम मिळेल या आशेने उधारीवर साहित्य घेऊन बांधकाम केल्याने उधारी देणारे दुकानदारही त्यांना पैश्यासाठी वारंवार त्रास देत होते. नातेवाईकांकडून उसनवार रक्कम मागून घरकुल निर्माण करणाऱ्या त्या दोघांसमोर दुकानदाराची उधारीची रक्कम द्यायची कशी, अशा विवंचनेत असताना दिवाकर मेश्राम यांचा स्वर्गवासही झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नीसमोर पुन्हा दुःखाचाडोंगर उभा राहीला. अशा परिस्थितीत त्यांना स्थानिक युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याचा हात दिला. *संघटनेचे पदाधिकारी आकाश येसनकर, सूरज गेडाम आणि निहाल गेडाम* यांनी *मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि अभियंता सुजीत जोगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.* त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्याने शेवटी नगर परिषद प्रशासनाने *कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले रमाई आवास योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या घरकुलाचे पैसे मिळाल्याने मेश्राम आणि दुर्गे कुटुंबासह अनेकांनी युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!