नकली दारू कारखान्याचा आंतरराज्यीय कनेक्शन उघड
नकली दारू कारखान्याचा आंतरराज्यीय कनेक्शन उघड
मूल mul तालुक्यातील चितेगाव येथील नकली दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून मोठ्या प्रमाणावर नकली दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
खुद्द उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home minister Devendra Fadanvis यांच्या गावालगतच हा नकली दारूचा कारखाना सापडणे आणि याची साधी माहिती स्थानिक पोलिसांना नसणे यावरूनही आता विविध चर्चांना उत आला आहे. अवैध धंदे करणारे आधी संबंधित पोलिस यंत्रणेला विश्वासात घेऊन, अर्थपूर्ण बोलणी करून नंतर व्यवसाय सुरू करतात. असाच प्रकार या नकली दारूच्या कारखान्याबाबत घडला काय? असुरक्षितपणे कोणीही अवैध व्यावसायिक एवढी मोठी गुंतवणूक करण्याचे धाडस कसे दाखवेल? याबद्दल आता शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान या नकली दारूच्या कारखान्यात आंतरराज्यीय कनेक्शन interstate connection असल्याचे आता उघड झाले आहे. तशी चर्चा दारू लाॅबीत खुलेआम सुरू आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथील रिंकू भाटिया Rinku Bhatiya नामक व्यक्तीच्या माध्यमातून नकली दारू तयार करण्यासाठी लागणारा स्पिरिट चितेगावात आणल्याची उघड चर्चा आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकली दारूच्या कारखान्यावर धाड मारल्यानंतर जवळपास 14 बॅरल स्पिरिट आढळून आले, पाचशे लिटर दारूही तयार करण्यात आली होती. एका व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले स्पिरिट आणि दारूची मात्रा लक्षात घेतल्यास 3800 लिटर स्पिरिट या ठिकाणी आढळून आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पिरीट कोणत्या वाहनाने आला? कुणाच्या परवान्यावर आला? मध्यप्रदेशातून आंतरराज्यीय सीमा ओलांडताना कुणालाच कसे आढळून आले नाही? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केले जात आहे.
मध्य प्रदेशातून हा स्पिरिट आणल्या गेल्याचे बोलल्या जात आहे. असे असेल तर मध्य प्रदेशातून येताना दारूबंदी असलेला गडचिरोली जिल्हा वाटेत येतो. यातील दुर्गम भागातही नकली दारूचा कारखाना तयार करणे शक्य होते. मात्र तसे न करता राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे मूळ गाव असलेल्या, ज्याने दारूबंदीचे आंदोलन केले त्यांचे क्षेत्रात, ज्यांनी दारूबंदी लावून धरली ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Guardian Minister Sudhir Mungantiwar यांच्या मतदारसंघात, मूलच्या अगदी हायवेवर नकली दारूचा कारखाना काढण्यामागे नेमकी भूमिका काय? कुणाला बदनामी करण्यासाठीचा तर हा षडयंत्र नसेल? याबद्दलही आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आला आहे.
इंदोर येथील रिंकू भाटिया नामक व्यक्तीने स्पिरिट नकली दारूच्या कारखान्यासाठी उपलब्ध करून दिले असल्याची चर्चा असली तरीही, स्थानिक बड्या नेतृत्वाचा पाठिंबा असल्याशिवाय अवैध व्यवसाय करणारे कुणीही दुसऱ्या राज्यातून येऊन अचानक नकली दारूचे कारखाने काढणार नाही. ही बाब तेवढीच सत्य आहे. अशा परिस्थितीत या नकली दारूच्या कारखान्याला कोणत्या मोठ्या राजकीय नेतृत्वाचा पाठबळ आहे? हे शोधणे उत्पादन शुल्क विभागासमोर आव्हान आहे. आणि ते शोधतील काय? हा देखील मोठा प्रश्न आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!