महिलांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही : रवींद्र शिंदे
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा (नागरी) : - २१व्या शतकाच्या उंबरठयावर देखील महिलांसाठी कायदे सक्षम नसून राजरोसपणे महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी झालेले नाहीत. आजही महिलांना त्यांच्या अधिकारातील कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारात वाढ होत आहे. मात्र आता यापुढे असे होणार नाही, कारण वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक हा पाठीराखा भाऊ म्हणून प्रत्येक महिलेच्या मागे सक्षमपणे उभा राहील, अशी ग्वाही रवींद्र शिंदे यांनी दिली.
हिंदू ह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती व मकर संक्रांतीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा महिला आघाडीतर्फे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात हळदीकुंकूम व स्नेहसंमेलन सोहळा दिनांक १६ जानेवारी २०२३ ते २७ जानेवारी २०२३ पर्यंत हळदी कुंकूम व स्नेहमिलन सोहळा थाटात सुरू आहे.
या सोहळ्याचा पहिला दिवस काल (दि.१६) ला दुपारी माढेळी व सायंकाळी महाडोळी येथे संपन्न झाला.
आज (दि.१७) ला दुसरा दिवस, नागरी येथे हळदी कुंकूम व स्नेहसंमेलन सोहळा पार पडला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर जिल्हा महिला संघटिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभेचे प्रमुख रवींद्र श्रीनिवास शिंदे तसेच वरोरा तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), विनोद भाऊ वाघमोडे, ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी, मायाताई नारळे महिला उपजिल्हाप्रमुख शिवसेना, कान्होपात्रा बाई सालेकर महिला उपतालुकाप्रमुख, सौ. सरलाताई मालोकर, शिवसेना वरोरा तालुका समन्वयक, नागरी पंचायत समिती विभाग प्रमुख सौ. प्रतिभाताई मांडवकर, सरपंच ग्रामपंचायत माढेळी व सौ. गंगाताई वाटोळे नागरी महिला शाखाप्रमुख तथा नागरी क्षेत्रातील संपूर्ण महिला समूदाय सदर कार्यक्रमात उपस्थित होत्या.
यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभेचे प्रमुख रवींद्र श्रीनिवास शिंदे यांचे हस्ते नागरी शिवसेना विभाग प्रमुखपदी प्रतिभा मांडवकर व नागरी शिवसेना शाखा प्रमुखपदी गंगा विनोद वाटमोटे यांची नियुक्ती करण्यात आली.
आनंदात व हर्शोल्हासात सदर उपक्रम सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!