आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा – प्रेमप्रकरणातून केली होती आत्महत्या
बल्लारपूर प्रतिनिधी
येथील डॉ राजेंद्रप्रसाद वॉर्ड राहणाऱ्या प्रशिक संजय भासारकर वय (21) या युवकाने घरी कोणीही नसतांना दुपट्ट्याच् साहाय्याने स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ह्या आत्महत्येला अमर तेलंग व दर्शन तेलंग हे दोघे कारणीभूत असून त्यांनीच प्रशिक ह्याला आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप नातेवाईक व परिसरातील लोकांनी केला होता. अखेर ह्या सर्वांनी पोलीस ठण्यासमोर एकत्रित येऊन त्या दोन्ही भावंडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी अमर व दर्शन ह्या तेलंग भावंडांवर गुन्हा नोंदविला.
अमर तेलंग, दर्शन तेलंग व त्याचे दोन मेहुणे यांनी 21 डिसेंबर रोजी प्रशिक भासारकर याला वॉर्डातील मक्का मशजिदजवळ मारहाण केली व त्यानंतर प्रशिकला जंगलाजवळील नाग मंदिर परिसरात नेऊन तिथेही मारहाण करून रक्तबंबाळ करून पसार झाले. मारहाणीचे वृत्त कळताच मृतकाचा भाऊ साहिल आपल्या मित्रांच्या मदतीने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत घरी घेऊन आले व पोलीस तक्रार दाखल केली ह्यावेळी आरोपी अमरची मेहुणी सुद्धा पोलीस स्टेशन मधे उपस्थित होती व तिने प्रशिकवर आपले प्रेम असुन त्याच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले होतें



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!