जिल्हा परिषद शाळा खेडी येथे सांस्कृतिक स्नेहसंम्मेलन साजरा - विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान

सावली - जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा खेडीच्या वतीने प्रजासत्ताकदिनी सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सचिन काटपल्लीवार, दीपप्रज्वलन माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल माचेवार होते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच असून तुकडोजी महाराजांच्या 
 "कोवळ्या कळ्यांमाजी लपले ज्ञानेश्वर, रवींद्र शिवाजी! विकसिता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष!! 
या अध्यायाचा दाखला देत विजय कोरेवार यांनी पालकांना प्रोत्साहित केले. यावेळी नवरत्न स्पर्धा व इतर स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नकला, वेशभूषा या कला सादर करण्यात आले. या कार्यक्रमात अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या मुलांनीही सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थ्यांनी केले. मंचावर मुख्यध्यापक नवनीत कंदालवार, उपसरपंच मुक्ता गरतुलवार, ग्रा पं सदस्य परशुराम मर्लावार, पोलीस पाटील कृपाल दुधे, नरेंद्र राचेवार आदी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता शिक्षक सुमित देवगडे, सुनंदा कुमरे, राजेंद्र उराडे, माधुरी  निंबाळकर, प्रतिक तुंगीडवार यांनी परिश्रम घेतले 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!