अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघेजण ठार तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना.
तळोधी बा.;
तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत नागभीड वरी फाट्यावर गोविंदपुर फाट्यावर काल रात्र साडे आठ ते नऊ वाजता चे दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघेजण ठार.
*सविस्तर वृत्त याप्रमाणे की बाळापुर वरून तळोधी मार्गाने आपल्या स्प्लेंडर या दुचाकी ने मंगरूळला जात असताना. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार मंगरूळ येथील आनंद मोतीराम मोहुर्ले (४२) हा जागीच ठार झाला. तर दुचाकी वरील किटाळी मेंढा येथील राजेंद्र तुळशीदास जेंगठे (३४) हा गंभीर अवस्थेत असताना पोलीस त्यांना दवाखान्यात नेत असताना रस्त्यात मरण पावला.
पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अज्ञात वाहना चा शोध घेण्याचा कार्य हा पोलीस निरीक्षक बी.आर. शेंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील चौकशी सुरू ठेवली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!