आनंदाचा दिवस पण... अश्रु अनावर

आनंदाचा दिवस पण... अश्रु अनावर


वार्ता - मंगल राजे मशाखेत्री
74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरगाव च्या इयत्ता 6 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी *कु आदर्श प्रमोद मडावी* हा विद्यार्थी खूप हुशार होतकरू आहे. वडील असून नसल्यासारखे,आई ची प्रकृती बरी राहत नसल्याने घरातील, पाणी, j1 बनवणे ते भांडी कुंडी करून न चुकता शाळेत हजर असतो, परंतु त्याच्या घरची परिस्थिती त्याला पाहिजे तेवढी साथ मिळत नसल्याचे बघून शाळेतील वर्ग 6 चे  वर्गशिक्षक मान श्री. गेडाम सर व वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत कु. आदर्श या विद्यार्थ्याला मान सौ. प्रतिभा ताई जुमनाके सरपंच व मान श्री. शरद ह. नागापुरे अध्यक्ष शा. व्य. स यांचे हस्ते स्कूल 🛍️ भेट दिली 
या विद्यार्थ्याला एक मदतीचा हात या उपक्रमातून भेट वस्तू देत असताना मान श्री. गेडाम सर व विद्यार्थी आदर्श मडावी अगदी भावुक होत त्यांना नैनामधील अश्रु अनावर झालेत.
या *एक हात मदतीचा* या उपक्रमाचं समस्त उपस्थितांच्या वतीने टाळ्या वाजवुन स्वागत करण्यात आलेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!