गृहमंत्रीच्या गावालगत नकली दारूचा कारखाना- पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गृहमंत्रीच्या गावालगत नकली दारूचा कारखाना- पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 

गृहमंत्रीच्या गावालगत नकली दारूचा कारखाना

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ गांव असलेल्या मूल पासून हाकेच्या अंतरावर नकली दारू निर्मीतीचा मोठा कारखाना सापडणे आणि या कारखाण्याची भनक मूल पोलिसांना नसणे यावरून मूल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'नकली दारूच्या कारखान्यावर धाडीने निर्माण केले तीन प्रश्न' या बातमीच्या अनुषंगाने, एका पोलिस अधिकारीने पब्लिक पंचनामाशी बोलतांना सांगीतले कि, माहिती असेल तरी किंवा माहिती नसेल तरीही मूल पोलिसांचे हे एक अपयशच आहे.

जबाबदार मंत्री असलेल्या क्षेत्रात साधारणत: कोणतेही गैरव्यवहार होणार नाही याकडे प्रशासनाचे बारीक लक्ष असते. विरोधक अशाच चुका पाहून मंत्रीला घेराव घालण्यांचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न होवू नये याकडे जबाबदार मंत्री व त्यांचे प्रशासनाचे ​कडक निर्देश, सुचना आणि लक्ष असतात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मूल येथील राष्ट्रिय महामार्गावर असलेल्या चितेगाव येथील नकली दारूच्या कारखाण्याचे प्रकरणात मात्र मूल पोलिसांचा गाफीलपणावर गृह विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी मूल पोलिसांचे भुमिकेवर नाराजी व्यक्त करीत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे एका बड्या राजकीय नेत्यांनी, लेखी तक्रार करण्यात आल्याचीही खात्रीलायक माहिती आहे.

यापूर्वीही मूल येथील क्रिकेटचा जुगार असो वा मंदातुकूम येथील कोंबड बाजारावरील धाड असो. ही सर्व मोठी कारवाई चंद्रपूरचे स्थानिक गुन्हे शाखेनी केली आहे. मूल होत असलेली अवैद्य गो—तस्करावर सावलीचे पोलिस कारवाई करीत असल्यांनेही मूल पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केलेल्या तक्रारीत लक्ष वेधले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!