बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल येथे प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
दिनांक 26 जानेवारी 2023 रोज गुरुवारला बल्लारपूर पब्लिक स्कूल, मुल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री वैरागडे सर सचिव शिक्षक प्रसारक मंडल,मुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच मुख्य अतिथि म्हणून न्यायाधीश श्री अहीर सर दिवानी व फौजदारी न्यायालय, मूल तसेच श्री कोरडे सर केंद्र प्रमुख, सोबत जिलानी सर माजी शिक्षणाधिकारी जि. प. चंद्रपूर तसेच संचालक JDPS स्कूल तसेच डॉ. प्रा. आगलावे सर, कर्मवीर महाविद्यालय मुल, प्राचार्य विनोद सर बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल तसेच विद्यार्थी प्रतिनिधि आदित्य सोनुले व विद्यार्थीनी प्रतिनिधि संस्कृती कटकमवार अतिथि म्हणुन कार्यक्रमात उपस्थित होते.
प्राचार्य विनोद सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केले व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच न्यायाधीश अहिर सर, प्राध्यापक आगलावे सर आणि श्री कोरडे व अध्यक्ष वैरागडे सर यांनी कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे आजचे महत्त्व व आपण तो का साजरा करावा याची माहीती दिली. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेगवेगळे नृत्य प्रस्तुत केले. विद्यार्थ्याच्या उत्साह द्विगुणित करण्याकरिता पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन तोषी जयस्वाल शिक्षिका तसेच उर्वशी पेंदोर वर्ग 7 वा व अंश तेलसे वर्ग 8वा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी भिमाई भडके यांनी केली व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रगानाने झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!