*मानवता हाच खरा धर्म असून मानव सेवा हीच खरी सेवा* - आमदार विजय वडेट्टीवार
सावली - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त पाथरी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित खंजेरी भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण आमदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते झाले.
तुकडोजी महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्याची मशाल भजनाच्या माध्यमातून पेटविली. ग्रामगितेतून राष्ट्रनिर्माणाचे विचार दिले त्यामुळे तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंतांची उपाधी मिळाली. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सेवा हाच खरा धर्म आहे तो जपायला हवा अशी शिकवण तुकडोजी महाराजांनी दिल्याचे मार्गदर्शनातून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख काँग्रेस आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जेष्ठ नेते चंद्रशेखर चन्ने, माजी सरपंच राजेश सिद्धम, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, सावली प. स.चे माजी सभापती विजय कोरेवार , रजनीकांत मोटघरे, गुरूदेव सेवा मंडळ चे जेष्ठ गोपालकृष्णजी ठीकरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, संजय पुपरेड्डीवार, बालाजी ठिकरे, दिलीप ठीकरे प्रामुख्याने उपस्थित होते. शुद्ध पेयजल योजनेसाठी 17 कोटी रुपये मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. तसेच तालुक्यात आज पावतो दीडशेहून अधिक कर्करोग ग्रस्त रुग्णांना मदत करून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कर्करोग निदान अत्याधुनिक यंत्र असलेल्या वाहनाने संपूर्ण मतदारसंघात कर्करोगाची निदान करून लोकांना प्राणघातच असलेल्या कर्करोगाच्या बचावासाठी प्रयत्न करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी तयार केलेल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!