भव्य रक्तदान शिबिराचे तळोधी बाळापूर पोलीस तर्फे आयोजन
तळोधी बा(यश कायरकर.)
उद्या दिनांक ५ जानेवारी रोज गुरुवारला तळोधी बाळापूर येथील साई मंदिराच्या पटांगणामध्ये तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरीही इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन गरजूंना मोलाचं रक्तदान करावे असे आव्हान तळोदी बाळापूर पोलीस विभागाने केलेले आहे.
यामध्ये रक्तदान शिबिर मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या दिनांक ५ जानेवारीला आयोजित सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणार्या रक्तदान शिबिराला युवक तथा संपूर्ण इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!