टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 मध्ये सरपंच ॲड. शर्मिला रामटेके यांचा सहभाग
तळोधी बा :
टाटा मॅरेथॉन मध्ये "महीला सरपंच म्यारेथॉन: लोकशाही बळकटीसाठी " या बॅनर खाली ग्रामीण भागातील 20 महिला सरपंच व नेतृत्वशील कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. महिला राजसता आंदोलन RSCD व ईशाद या संस्थांचा यांच्या पुढाकाराने, गाव विकास प्रशिक्षण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी 'टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 आयोजित करण्यात आलेले आहे.
या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातील पंचायत मधील वीस महिला नेतृत्व सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून नागभीब तालुक्यातील ॲड. शर्मिला रामटेके या नवेगाव पांडवच्या सरपंचा यांची निवड करण्यात आलेली आहे.
पंचायत महिला आरक्षणाची ताकद ही समाजाने आदरपूर्वक समजून घ्यावी , स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायतता व लोकशाही बळकटीसाठी , आपणाला हवे असलेले गरजेचे प्रशिक्षण, आधुनिक माहिती व जनसंपर्क कौशल्य शिकायला लागणार्या निधी निर्मितीसाठी. या उद्देशाने मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या या महिला सरपंचाचा अनुभव महाराष्ट्रातील अन्य महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने , भरविनात येणारी ही मॅराथॉन ला राज्याचे निवृत्त मुख्य सचिव व माजी राज्य निवडणूक आयुक्त ज स घगरियाया यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभत आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून महिला सरपंच संपन्न अशा अनुभवाची शिदोरी आपापल्या गावात घेऊन जातील असा आशीर्वाद आयोजकांनी व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!