विज्ञान युगात हरवली खेळायची पटांगणे..




शेगाव... (जगदीश पेंदाम)

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या गीतांच्या आठवणी सध्या स्थितीत होत आहे कारण लहानपणीच्या आठवणीतूनच माणूस मोठा होत असतो परंतु आज ग्रामीण,शहरी भागातील खेळायला असणारे पटांगणे नामशेष होताना दिसत आहे....
पूर्वी मैदानात खेळणारी खेळ मुले आत्ता गल्लीत खेळताना दिसत असून विज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल मध्ये मुलं खेळताना दिसत आहे त्यामुळे मुलांमध्ये आज विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे, पूर्वी प्रत्येक गावात मुलांना खेळण्यासाठी मैदाने असायची त्या ठिकाणी विटी, दांडू, एकमेकावर पाटी बसवणे, दोन्ही बाजूने दोरीने ओढणी, लगोरी, लपाछपी, कंचा, आंब्याच्या बियापासून खेळणारे खेळ, कबड्डी खो-खो तर क्रिकेट पर्यंत सर्वच खेळ खेळले जात असायचे त्यामध्ये कबड्डी, कुस्ती हे खेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळली जात होते.. परंतु गेल्या काही वर्षापासून सगळीकडे लोकसंख्या वाढली मुळे लेआउट चे प्रमाण वाढले, घरे बांधकाम झपाट्याने होत चालली असल्यामुळे खेड मैदान नष्ट होत चाललेले आहे..
आता तर मुले शाळेतून आल्यानंतर घरी मोबाईल वरच व्यस्त दिसत असून त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे ..
शहरात सहित ग्रामीण भागात खेळाची मैदान नसल्यामुळे सैन्य भरती,पोलीस भरती करिता जाण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या मुलांना, मुलींना व्यायामा सह धावण्याकरीता मुख्य रस्त्याच्या उपयोग करावा लागत असल्यामुळे यातून अपघाताची शक्यता वाढत आहे व तशा घटना सुद्धा घडलेल्या आहे, तर जंगलात असणाऱ्या गावातील व्यक्तींना व्यायामावेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे, त्यामुळे ज्या मुला, मुलींना व्यायामाची सवय क्रिकेट खो खो कबड्डी खेळण्याची सवय असून सुद्धा पटांगणे नसल्यामुळे  कुठेतरी बाधा निर्माण होत असल्यामुळे शासनाने खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!