खासदार चषक २०२२ च्या भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न.
जय शिवराजे क्रिकेट क्लब केशरवाही ता.सावली जि.चंद्रपुर द्वारा आयोजित
सावली:(प्रतिनिधी)
खासदार चषकाच्या भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा जय शिवराजे क्रिकेट क्लब केशरवाही ता.सावली या ठिकाणी कार्यक्रमाचे शुभारंभ व उद्घाटन रीबिनतकापून या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.*
*या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार.अशोकजी नेते यांनी बोलतांना युवकांने मैदानी खेळ खेळावे अशा या खेळामुळे युवकांना उत्साह, आनंद मिळतो.खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते.अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी खा.अशोकजी नेते यांनी केले.*
*खासदार चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार खा.अशोकजी नेते यांचे कडून २१००१/- द्वितीय पुरस्कार १७००१/- व तृतीय पुरस्कार ५००१/-रूपये अशाप्रकारे ठेवण्यात आले.*
*या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी प्रास्ताविकामध्ये बोलतांना मैदानी खेळ असो कि कोणताही क्षेत्र असो जसे सामाजिक, राजकीय यामध्ये बदल दर २० वर्षांनी होत असते. युवकांनी व मुलाने मैदानी खेळ खेळावे असे यावेळी प्रतिपादन केले.*
*या प्रसंगी खासदार अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, जिल्हाध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल,नगरसेवक न.प.सा. तथा ता.महामंत्री सतिश बोम्मावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर,युवा मोर्चाचे ता.अध्यक्ष विनोद धोटे,जेष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार,नगरसेविका निलमताई निखिल सुरमवार,माजी जि.प.सदस्या योगिताताई धनराज डबले,माजी सभापती पं.स.छायाताई दिपक शेंडे,सरपंच प्रितिताई नितीन गोहणे,ग्रा.प.सदस्य प्रमोद भोपये,भाजपा कार्यकर्ते प्रभाकर चौधरी, भाजपा दलित आघाडीचे लोकनाथ रायपुरे,गितेश चिताडे,युवा कार्यकर्ते अंकुश भोपये,अभिषेक बोरकुटे,विकास आभारे,विरू भोपये,तसेच अनेक मोठया संख्येने कार्यकर्ते व युवा क्रिकेट वर्ग उपस्थित होते.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!