महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे दंत तपासणी शिबीर संपन्न .
मूल प्रतिनिधी
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे सोमवार दि. २६ डिसेंबर २०२२ रोजी क्रिस्टल कॉन्वेंट,मुल येथे विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
यातलाच एक भाग म्हणून न्यासातर्फे दंत तपासणी करण्यात आली .
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने सौ . गिता कोंतमवार यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी डॉ .सौ . सायली बोकारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या उपक्रमाचा लाभ एकूण १३० विद्यार्थ्यांनी घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!