महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चंद्रपूर येथील शाळेत योग शिबिर संपन्न .
मूल (प्रतिनिधी)
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी चंद्रपूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा,तुकूम, चंद्रपूर येथे योग शिबिर घेण्यात आले*.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी योग शिक्षिका सौ. नीता धामंगे, सौ. प्रतिभा रोकडे व सौ. कामिनी वैरागडे यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रजनी मत्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या उपक्रमाचा लाभ एकूण ७६ विद्यार्थ्यांनी घेतला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!