अवैध रित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या MH34 - BR 2692 या ट्रॅक्टर वर कारवाई करून तहसील कार्यालयात जमा करा
तहसीलदार यांनी दिले पोलीस निरीक्षक यांना पत्र
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - अवैध गौण खनिज नियंत्रण पथक यांनी प्रतिवेदन तहसीलदार चिमूर यांना दिले असून या विषयाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात येते की, चिमूर तालुक्यातील होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुक व उत्खननावर आळा घालण्याचे दृष्टीने तसेच गौण खनिज उदिष्टे पूर्ण करण्याचे दृष्टीने चिमुर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना अवैध गौण खनिज प्रकरणांचा शोध घेणे, वाहतूक व उत्खनन तसेच अवैध रेतीसाठा जप्त करण्याबाबत आदेशित केलेले आहे. दिनांक.26/12/2022 रोजी रात्री 01:15 वाजता अवैध रेतीची वाहतूक करीत असतांना ट्रॅक्टर क्रमांक MH 34 BR 2692 आढळून आलेले होते. सदर वाहन जमा करून तहसिल कार्यालय चिमूर येथे जमा करण्याबाबत सुचना दिल्या असतांनासुध्दा ट्रॅक्टर चालकाने सदर वाहन पळवून नेले. त्यामुळे सदर वाहन मालकास सुचना देण्यात आल्या असता ट्रैक्टर तहसील कार्यालय चिमूर येथे जमा करण्याची हमी दिलेली आहे. परंतू सदर ट्रैक्टर तहसिल कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आलेले नाही. करीता सदर ट्रैक्टर क्र. MH 34 BR 2692 ला तात्काळ जप्त करून या कार्यालयास जमा करण्यात यावे.अशा सूचना तहसिलदार यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिमूर यांना दिल्या आहे.या सर्व प्रकरणामुळे चिमूर तालुक्यातील रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!