सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षवर अविश्वास ठराव पारित

सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षवर अविश्वास ठराव पारित

तळोधी बा
नागभीड तालुक्यातील सर्वांत मोठी सेवा सहकारी संस्था मर्यादित तळोधी बा नोंदणी क्र. २९ चे विध्यमान अध्यक्ष व्यंकटराव विठोबा कामडी यांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ मनोहर टेभुरकर व इतर आठ संचालक यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर या कार्यालयात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे.

             सदर अविश्वास प्रस्तवावर सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३,१ड व त्याखालील नियम १९६१मधील नियम २७अ नुसार विहित केलेल्या पध्दती प्रमाणे अविश्वास ठरवास उपस्थित सर्व संचालक यांनी चर्चा सत्रात भाग घेतला.यावेळी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा वर अविश्वास ठराव ९ विरुद्ध ४ असा ठराव पारित झाला. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून उईके यांनी कारभार बघितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!