अवैध देशीदारु विक्रेत्याला मुद्देमालासह पकडुन महिलांनी केले पोलिसांचे स्वाधिन :
अवैध देशीदारु विक्रेत्याला मुद्देमालासह पकडुन महिलांनी केले पोलिसांचे स्वाधिन :
तळोधी बा : (यश कायरकर)
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवपायली येथे अवैध देशीदारु विक्रेता विनोद भुरसे हा खुल्लेआम दारूचा व्यवसाय करित होता.त्यामुळे गावातील शातंता व सुव्यवस्था भंग होत होती तसेच अनेक तरूण व्यसनाचे आहारी जाऊन संसार उद्धवस्त होण्याचीही वेळ देवपायली वासीयावर आली होती.असातच काल रात्रो 8 वाजताचे दरम्यान महिला व तंटामुक्त समिती यांचे पूढाकाराने सदर अवैध दारुचा व्यवसाय करित असलेल्या या इसमाला रंगेहाथ पकडून ग्रामपंचायत मधे आणण्यात आले व नतंर पोलिसांना यांची माहिती देवून त्यांचे स्वधिन करण्यात आले.यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगदिश तिवाडे, उपसरपंच इंदिरा नवघडे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर नवघडे,संदिप नवघडे,तथा महिला मंडळी व गावकरी उपस्थित होते. मात्र सकाळ होताच हा इसम पुन्हा गावातच हजर होता व पुन्हा दारूचा व्यवसाय करित दिसल्याने ग्रामस्थांनी पोलिसां विषय संशय व्यक्त केला असुन महिलांनी व तंमुस समितीनी पकडलेल्या या अवैध दारु विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!