झाडे लावा झाडे तोडा,सरकारची नविन मोहिम सुरू
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - झाले लावा झाडे तोडा,अश्या प्रकार ची सरकारची नविन मोहिम चालू असल्याचे दिसुन येत आहे.या अगोदर सरकारणे झाडे लावा झाडे,झाडे जगवा हि मोहीम सुरू होती.पण आता या उलट पाहायला मिळत आहे. काही दिवसा अगोदर रोडच्या बाजुला झाडे लावण्यात आले होते पण त्याच रोडचे रुंदी करणाचे काम सुरू झाले असता लावलेली झाडे पोकलँड द्वारे तोडण्याचे काम होत आहे.जेव्हा झाडे लावण्यात येतात तेव्हा या सर्व गोष्टी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या लक्षात का येत नाही ? जांभुळघाट-बोडदा रोड वर काम सुरू आहे या मध्ये बरेचशे झाडे उपडण्यात आले आहे.अशा प्रकारे काम अनेक ठिकाणी रोड वर होताना दिसुन येत आहे.शासनाच्या नियोजनावर नियत्रन आहे की नाही किंवा जानिवपुर्व अश्या प्रकारची योजना राबवित तर नाही ना..? अश्या प्रकारची चर्चा जनते मध्ये सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!