जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, सेंद्री बु. येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन मुंबई टीम ची भेट

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
         
पवनी : - दिनांक.1 डिसेंबर 2022 रोजी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन च्या सीनिअर बिझिनेस अनालिस्ट कु.सोनिया गांधी यांनी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, सेंद्री बू. शाळेमध्ये भेट देऊन शाळेची दखल घेतली.मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन संस्थेमार्फत SCALE प्रकल्प मागील 3 वर्षांपासून राबविला जात आहे. व या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य सत्र देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व निर्णय क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संबंधी मुंबई च्या चमूने शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थी, आणि संपूर्ण शिक्षक यांच्याबरोबर चर्चा केली आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून झालेले परिवर्तन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाल संसदेच्या पुढाकारातून करवून घेण्यात आले.यावेळी या ठिकाणी संस्थेचे पवनी तालुक्याचे तालुका व्यवस्थापक विनोद शंभरकर, शाळा सहाय्यक अधिकारी भुषण कोकुडे, समुदाय समन्वयक अनिल जांभूरे, शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर मेश्राम , आनंद चाचेरे पदवीधर शिक्षक , इतर शिक्षक वृंद आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हा उपक्रम मॅजिक बस संस्थेच्या माध्यमातून पवनी तालुक्यातील 73 शाळांमध्ये राबविल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!